प्रवाशांनो, उगाच जीवाशी खेळू नका, मुलुंडजवळ दाेघांना अपघात

Mulund
प्रवाशांनो, उगाच जीवाशी खेळू नका, मुलुंडजवळ दाेघांना अपघात
प्रवाशांनो, उगाच जीवाशी खेळू नका, मुलुंडजवळ दाेघांना अपघात
प्रवाशांनो, उगाच जीवाशी खेळू नका, मुलुंडजवळ दाेघांना अपघात
See all
मुंबई  -  

लोकलमधून प्रवास करताना 'फूट बोर्डवर उभे राहू नका', 'पादचारी पुलाचा वापर करा' 'रेल्वे रूळ ओलांडू नका' अशा अनेक सूचना ऐकू आल्या तरी, काही प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात. महत्त्वाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. तर काहींना कायमचे अपंगत्व येते. अशाच हलगर्जीपणातून बुधवारी मुलुंड ते नाहूरदरम्यान दोन रेल्वे अपघात घडले.रुळ ओलांडताना अपघात

गणेश पाटील या 35 वर्षांच्या प्रवाशाला रेल्वे रूळ ओलांडताना मालगाडीचा धक्का लागून गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्याला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे.


फुटबोर्डवर उभा असताना अपघात

विपुल साळवे हा 18 वर्षांचा तरुण धावत्या लोकलमध्ये फुटबोर्डवर उभा असताना तोल जाऊन खाली पडला. या अपघातात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी विपुलला सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.हे देखील वाचा - 

संसदेच्या स्थायी समितीची 'सीएसटी'ला भेटडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.