Advertisement

'एसटी'ची पारदर्शक बस!

एसटी प्रवास करणाऱ्या प्रवासी व पर्यटकांना आता प्रवासादरम्यान निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे.

'एसटी'ची पारदर्शक बस!
SHARES

एसटी प्रवास करणाऱ्या प्रवासी व पर्यटकांना आता प्रवासादरम्यान निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे, आणि या प्रवासी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळानं पारदर्शक छत असलेली बस सेवेत दाखल केली आहे.

एसटीच्या पुण्यातील दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी केलेली ही बस पर्यटनासाठी वापरण्यात येणार आहे. सातारा विभागाला अशा प्रकारची पहिली बस ताब्यात देण्यात आली. प्रवाशांना पर्यटनाचा आनंद घेता यावा यादृष्टीने बसची बांधणी केल्याची माहिती मिळते.

या बसचे छत पारदर्शक आहे. चालकांकडून प्रवाशांना, पर्यटकांना स्थळांची माहिती मिळावी यासाठी अशी यंत्रणाही या बसमध्ये उपलब्ध केली आहे. 

प्रवाशांना मोबाइल चार्जिग पॉईंट, अतिरिक्त सामानासाठी दोन बूथ, बसच्या मागे बाहेरील बाजूस एलईडी मार्ग फलकाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

प्रवाशांना बसमध्ये प्रवेशासाठी पुढच्या बाजूनेच व्यवस्था करण्यात आली आहे. ही बस महाबळेश्वर दर्शन व प्रतापगड दर्शनासाठी महाबळेश्वर आगारात उपलब्ध असणार आहे. 

  • महाबळेश्वर दर्शनासाठी दुपारी २:३० वाजता उपलब्ध असेल. या बसचे प्रवासी भाडे प्रत्येकी १०५ रुपये असेल. 
  • प्रतापगडसाठी ही बस सकाळी ९:३० वाजता सोडण्यात येईल. या बससाठी ११५ रुपये तिकीट असेल.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा