
18 सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या कालावधीसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थींना नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ही सुविधा आहे.
ई-केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ आहे आणि आतापर्यंत अनेक लाभार्थींनी ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी इतर लाभार्थींनाही ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी आज मंत्रालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या.
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसीच्या माध्यमातून केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. महिला स्वतःच्या मोबाईल फोनवरून अल्पावधीत ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी क्रमांक पूर्ण केलेला नाही, त्यांनी ही प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
हेही वाचा
