Advertisement

मुंबईच्या ‘बिर्याणी किंग’चा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईतील 'बिर्याणी किंग' आणि 'दिल्ली दरबार' या प्रसिद्ध रेस्टॉरंटचे मालक जफरभाई गुलाम मन्सुरी यांचा गुरूवारी कोरोनामुळं मृत्यू झाला.

मुंबईच्या ‘बिर्याणी किंग’चा कोरोनामुळे मृत्यू
Credit: Twitter
SHARES

मुंबईतील 'बिर्याणी किंग' आणि 'दिल्ली दरबार' या प्रसिद्ध रेस्टॉरंटचे मालक जफरभाई गुलाम मन्सुरी यांचा गुरूवारी कोरोनामुळं मृत्यू झाला. ते ८४ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तब्बल सहा दशकं त्यांनी मुंबईतील खवय्यांना लज्जतदार बिर्याणी खाऊ घालत. मुंबईचे ‘बिर्याणी किंग’ असा ताज मिरवला.

कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे जफरभाई यांना मुंबईथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. २ सप्टेंबरपासून त्यांच्यावर तिथं उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचं निधन झाले. त्यानंतर मरिन लाइन्सजवळील बाबा कब्रिस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला.

हेही वाचा- “कोरोनाशी लढायचं होतं, कंगनाशी नाही”

मूळचे अहमदाबादचे असणारे जफरभाई तरुणपणी कामाठीपुरा जवळच्या इस्लामपुरामध्ये एक छोटाशी खाणावळ चालवायचे. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागले. त्यानंतर त्यांना वडिलोपार्जित खानावळीच्या व्यवसायात लक्ष घालावं लागलं. पारंपरिक रेसिपीचा वापर करत लज्जतदार बिर्याणी बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या खानावळीतील जेवणाला सभा-समारंभातील मेजवाणीसाठी मोठी मागणी असायची. 

खानावळीचा व्यवसाय वाढीस लागल्यानंतर त्यांनी १९७३ साली मुंबईतील ग्रँटरोड इथं दिल्ली दरबार नावाने रेस्टारंट सुरू केलं. या रेस्टाॅरंटमधील मोगलाई पदार्थांची चव हळुहळू मुंबईकरांच्या जीभेवर रंगाळू लागली. बिर्याणीसाठी तर दिल्ली दराबर ओळखलं जाऊ लागलं. मुंबईकरांच्या वाढत्या प्रतिसादानंतर आणि रेस्टाॅरंट व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर जफरभाईंनी २००६ साली आपल्या कौटुंबिक व्यवसायातून काढता पाय घेत स्वत:ची ‘जाफर भाईज दिल्ली दरबार’ ही स्वतंत्र फूडचेन सुरु केली. सध्याच्या घडीला केवळ मुंबईच नव्हे, तर भारतातील अनेक शहरांपासून ते दुबईपर्यंत दिल्ली दरबारचा व्यवसाय पसरला आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी दिल्ली दरबारला गौरवण्यात देखील आलेलं आहे.

हेही वाचा- सुट्टीसाठी डॉक्टर 'असा' करणार निषेध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा