Advertisement

मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज

करारानुसार दोन्ही मार्गिकांसाठी दरवर्षी १२० दशलक्ष युनिटहून अधिक वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबई: ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ला अदानी समूहाची वीज
SHARES

‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकेसाठी अदानी समुहाकडून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अदानी समुहात याबाबत नुकताच भागिदारी करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही मार्गिकांसाठी दरवर्षी १२० दशलक्ष युनिटहून अधिक वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

अदानी समुहाकडून मुंबई उपनगरात वीजपुरवठा करण्यात येतो. मुंबईत अदानीचे ३१ लाख वीज ग्राहक आहेत. यात निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. आता हा समूह मुंबईतील महत्त्वाच्या अशा ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेलाही वीजपुरवठा करणार आहे.

दोन्ही मेट्रो मार्गिकाचा २० किमीचा पहिला टप्पा यापूर्वीच सेवेत दाखल झाला आहे. दुसरा टप्पा महिन्याभरात सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

“गेल्या काही वर्षांत विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालय, मेट्रो रेल्वे, सॉफ्टवेअर पार्क आणि हॉटेलसारख्या ऊर्जा-केंद्रित आस्थापनांनी अदाणी इलेक्ट्रिसिटीला त्यांची प्रमुख पुरवठादार कंपनी म्हणून निवडले आहे. याद्वारे समर्थित स्पर्धात्मक दरांमध्ये विश्वासार्ह आणि शाश्वत वीज पुरवठ्यामुळे तसेच ग्राहक-केंद्रित सेवा देत असल्यामुळे कंपनी अल्पावधीत लोकप्रिय बनली आहे”, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी (AEML) च्या प्रवक्त्याने सांगितले.हेही वाचा

३ किलोमीटरची पायपीट वाचणार, माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार

Mahaparinirvan Day: दादर स्थानकात फलाट क्रमांक 6 तून प्रवेशबंदी, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा