Advertisement

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशभरात फटाके फोडत मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात आली.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला
प्रतिकात्मक फोटो
SHARES

मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला आहे. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता (Air Quality Index) आणखी वाईट होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशभरात फटाके फोडत मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होणार आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत आहे.

मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 वर सर्वाधिक वाईट स्थितीत आहे. सोबतच मुंबईतील बीकेसी, मालाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत आहे.

मुंबईतील सरासरी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI)145 वर आहे. भांडूप येथे एक्यूआय (AQI) 91, कुलाबा 111, मालाड 204, माझगाव 200, वरळी 53, बोरिवली 94, बीकेसी 208, चेंबूर 156, अंधेरी 193, नवी मुंबई 300 वर आहे. हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे वायु प्रदूषणास संवेदनशील असणाऱ्या नागरिकांना आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे.

गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाच्या निर्बंधात दिवाळी साजरी केली असताना फटाक्यांवरही निर्बंध होते यामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) मध्यम पातळीवर होता. पण पावसाळ्यात स्थिर असलेला हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दिवाळी सुरू होताच खाली घसरला आहे.

संपूर्ण पावसाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थितीत होता. पण पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतिषबाजीमुळे हवा गुणवत्ता खालवली आहे.

सोमवारी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 06.53 ते 08.16 वाजेदरम्यान होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालं. परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली.



हेही वाचा

दादर आणि गिरगाव चौपाटीनंतर आता नरिमन पॉईंट इथे व्ह्यूईंग डेक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा