Advertisement

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम पूर्ण

विमानतळाच्या सेवांवर कोणताही परिणाम न होऊ देता पूर्ण काम पूर्ण झाल आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचं रिकार्पेटिंगचे काम पूर्ण
SHARES

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport Maintenance) धावपट्टीचं रिकार्पेटिंग पूर्ण झाले आहे. विमानतळाच्या सेवांवर कोणताही परिणाम न होऊ देता पूर्ण काम पूर्ण झाल आहे. यामुळे पुढील दहा वर्षासाठी धावपट्टी अर्था रनवे मजबूत करण्यात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला यश आले आहे. 

CSMIA सरासरी 950 फ्लाइट्ससह जगातील सर्वात व्यस्त सिंगल-क्रॉसओव्हर रनवे चालवते. अशा प्रकारे, लँडिंग आणि टेक-ऑफ दरम्यान सतत आणि सुरक्षित विमान ऑपरेशन्स राखण्यासाठी धावपट्टी चांगल्या स्थितीत ठेवणे अत्यावश्यक आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेला रीकार्पेटिंग हे 10 जून 2023 रोजी पूर्ण झाले.

धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी जवळपास 200 कर्मचारी काम करत होते. मुंबई विमानतळाने विमान कंपन्या, विमान वाहतूक प्राधिकरण आणि त्याच्या अनेक भागधारकांच्या मदतीने दुरुस्ती आणि देखभाल योजना राबवली होती.



हेही वाचा

स्वारगेट ते मंत्रालय नवीन हिरकणी बससेवा सुरू

प्रवाशांसाठी गुडन्यूज, मुंबईसाठी 238 वंदे मेट्रोची निविदा निघणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा