Advertisement

स्वारगेट ते मंत्रालय नवीन हिरकणी बससेवा सुरू

पुणे विभागातील दोन नवीन हिरकणी सेवा 'स्वारगेट-मंत्रालय' मार्गावर धावू लागल्या आहेत.

स्वारगेट ते मंत्रालय नवीन हिरकणी बससेवा सुरू
SHARES

राज्य परिवहन (ST) महामंडळाची नवी हिरकणी सेवा प्रतिष्ठेच्या 'स्वारगेट- मंत्रालय' मार्गावर सुरू झाली आहे. पुणे विभागातील दोन नवीन हिरकणी सेवा 'स्वारगेट - मंत्रालय' मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नवीन हिरकणी बससेवेचा लाभ मिळाला आहे.

एसटीच्या ताफ्यातील हिरकणी बसची दुरवस्था झाली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांनी एसटी बसचा वापर बंद केला. त्यानंतर एसटी महामंडळाने स्वनिर्मित हिरकणी बसेस उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या दापोडी, पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळेत एकूण 200 नवीन हिरकणी बस तयार केल्या जात आहेत. सध्या रायगड, पुणे विभागाच्या ताफ्यात नवीन हिरकणी बस दाखल झाली आहे.

पुणे विभागातील दोन हिरकणी बस 'स्वारगेट - मंत्रालय' या मार्गावर धावू लागल्या आहेत. हिरकणी बस स्वारगेटहून सकाळी 5:45 वाजता निघेल आणि सकाळी 9 किंवा 9:30 वाजता मंत्रालयाला पोहोचेल. त्यानंतर सकाळी 10.30 च्या दरम्यान ही बस मुंबई सेंट्रल आगारात येईल आणि तेथून स्वारगेटकडे रवाना होईल, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.



हेही वाचा

मुंबईकरांनो, वाहतूक कोंडी आणखीनच बिकट होणार

खारघर ते बीकेसी नवीन प्रीमियम एसी बस सेवा सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा