Advertisement

वांद्र्यातील इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा जागीच मृत्यू

मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

वांद्र्यातील इमारतीचा स्लॅब कोसळला; एकाचा जागीच मृत्यू
SHARES

मुंबईतील वांद्रे (Bandra) परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे परिसरात बेहराम पाडा परिसरात ४ मजली रझाक चाळ आहे. रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास या ४ मजली इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत. सद्यस्थितीत घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

या ठिकाणी सध्या अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस उपस्थित आहेत.
हेही वाचा - 

रविवारी मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० कोरोनाबधितांचा मृत्यू

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा