Advertisement

दारूबंदीसाठी ५० टक्‍क्यांची अट बदलणार


दारूबंदीसाठी ५० टक्‍क्यांची अट बदलणार
SHARES

दारूबंदीसाठी वॉर्डातील एकूण मतदारांच्‍या ५० टक्‍क्यांची अट बदलण्याच्या निर्णयावर येत्या तीन महिन्यात फेरविचार करण्याची घोषणा उत्‍पादन शुल्‍कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.


'ही अट घटनाबाह्य'

मुंबई दारूबंदी आदेशानुसार २५ मार्च २००८ च्‍या तरतुदीनुसार जर नगरपरिषद अथवा महापालिका क्षेत्रातील एखाद्या वॉर्डातील २५ टक्‍केपेक्षा कमी नसलेल्‍या महिला मतदार किंवा एकूण मतदार यांनी संबंधित अधीक्षकांकडे तक्रार केल्‍यास त्‍यावर मतदान घेण्‍यात येते. मतदानाला त्‍या वॉर्डातील एकूण मतदानाच्‍या ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदार किंवा महिला मतदारांनी दारू विक्रीच्‍या विरोधात मतदान केल्‍यास त्‍या परिसरात दारूबंदी केली जाते, असं लेखी उत्‍तर मंत्र्यांनी दिलं होतं. 


आशिष शेलारांचा आक्षेप

त्‍याला आक्षेप घेत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही अट घटनाबाह्य आहे, असं म्हणत घटनेत कुठेही ५० टक्क्यांपेक्षा जास्‍त मतदारांनी उपस्थित राहावे असं नमूद नाही. अन्‍य कुठल्‍याही निवडणुकीत ही अट घातली जात नाही कारण ती घटनाबाह्य आहे, असं सांगून हा शासनाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी केली. या मागणीला सर्वच पक्षांच्‍या आमदारांनी जोरदार पाठींबा देत ही दुरूस्‍ती तातडीने अथवा आजच्‍या आजच करावी, अशी आग्रही मागणी दोन्‍ही बाजूंनी करण्‍यात आली.


शुल्क मंत्र्यांचं उत्तर

त्‍याला उत्‍तर देताना उत्‍पादन शुल्‍क मंत्र्यांनी सांगितलं की, हा आदेश तातडीने बदलता येणार नाही. त्‍याची कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. सभागृहाच्‍या सर्वच सदस्यांनी केलेल्‍या मागणीचा विचार करून येत्‍या तीन महिन्‍यांत या शासनाच्‍या आदेशात बदल करण्‍यात येईल, असं त्‍यांनी स्‍पष्‍ट केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा