Advertisement

बीएमसीकडून कचरा जाळण्यास बंदी, पहा नव्या गाईडलाईन्स

यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, महापालिकेने 6000 बांधकाम साइट्सना नोटीस पाठवल्या आहेत.

बीएमसीकडून कचरा जाळण्यास बंदी, पहा नव्या गाईडलाईन्स
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, बीएमसीने फॉगिंग मशीन आणि स्प्रिंकलर बसवण्यासाठी 6,000 बांधकाम साइट्सना नोटीस पाठवल्या आहेत. 

बुधवारी पत्रकार परिषदेत केसरकर यांनी असेही सांगितले की, बीएमसी लवकरच देवनार आणि कांजूरमार्ग येथील दोन लँडफिलमधील कचऱ्याचे विलगीकरण करून कचऱ्यातून प्रदूषक काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. 

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या नवीन संचामध्ये असे म्हटले आहे की, "BMC अंतर्गत असलेल्या भौगोलिक क्षेत्रात, विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी उघड्यावर जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल." 

बांधकाम साइटवर नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त, बीएमसीने सांगितले की ते लवकरच शहरातील प्रत्येक 24 वॉर्डांमध्ये 30 'क्लीन अप मार्शल' तैनात करणार आहेत. थुंकणे, कचरा टाकणे आणि जाळणे यावर नियंत्रण ठेवतील आणि दंड आकारतील. 

काही हॉटस्पॉट्समध्ये, जिथे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक झपाट्याने खालावला आहे, तिथे BMC देखील एअर-प्युरिफायर बसवण्याची योजना आखत आहे. 

केसरकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ते प्रत्येक आठवड्याला पालिकेच्या कारवाईचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करतील. 

केसरकर म्हणाले, “यापूर्वी या मुद्द्यांचा आढावा नागरी संस्थेत कोणी घेत नसे. मात्र आता मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून दर आठवड्याला आढावा घेईन. येत्या दोन महिन्यांत शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची आशा आहे.



हेही वाचा

ठाणे : मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा