Advertisement

कचऱ्यासंबंधी तक्रार करणं सोप्पं,'या' क्रमांकावर पाठवा फोटो

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालिकेने सोमवार, ५ जूनपासून ही सेवा सुरू केली.

कचऱ्यासंबंधी तक्रार करणं सोप्पं,'या' क्रमांकावर पाठवा फोटो
SHARES

सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी महापालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून ही सेवा कार्यान्वित झाली आहे.  

या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे, मृत जनावरे उचलणे या तक्रारींची थेट छायाचित्रे पाठवता येणार आहेत. नागरिकांनी छायाचित्रासह, त्या ठिकाणाचा पत्ता/जीपीएस लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे.

तक्रार व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. त्यामुळे तक्रार सोडवण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे.

संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करून, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. नागरिकांना तक्रारीवर उपाययोजना झाल्याचे प्रमाण मिळणार आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

असा आहे चॅटबॉट व्हॉट्सअॅप क्रमांक
८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता येणार आहे.हेही वाचा

आता बीएमसी घरगुती घातक कचऱ्यावर लक्ष केंद्रित करणार

BMC पुढील 2 वर्षात संपूर्ण शहरात नवीन गटार लाइन टाकणार">BMC पुढील 2 वर्षात संपूर्ण शहरात नवीन गटार लाइन टाकणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा