Advertisement

पंतप्रधान आता तुम्हीच द्या न्याय, ऐरोलीतील निर्वासित दिल्लीला निघाले पायी!


पंतप्रधान आता तुम्हीच द्या न्याय, ऐरोलीतील निर्वासित दिल्लीला निघाले पायी!
SHARES

मुंबई ते दिल्लीदरम्यानचे अंतर 1500 किलोमीटर इतके आहे. हे अंतर विमान, ट्रेन किंवा गाडीने नक्कीच गाठता येते. पण हाच प्रवास पायी करण्याचा कधी विचार केला आहे. विचारात पडलात ना?, नवी मुंबईतल्या एरोली परिसरातील 27 जण हाच प्रवास पायी करणार आहेत. यामध्ये तरुण आणि महिलांचा देखील समावेश आहे.

विशेष म्हणजे या 27 जणांचा समुह आपली फिर्याद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जात आहेत. 9 मे 2017 मध्ये  नवी मुंबईच्या एरोली येथील चिंपाडा परिसारतील 400 घरांवर एमआयडीसीने तोडक कारवाई केली होती. त्यामुळे बेघर झालेल्या तेथील रहिवाशांनी अनेक नेत्यांकडे धाव घेत आपली समस्या त्यांच्याकडे मांडली. पण कुणीचे त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या नाहीत. अखेर हताश झालेल्या या निर्वासितांनी आपल्या समस्या पंतप्रधान मोदींकडे मांडण्यासाठी मुंबईपासून ते दिल्लीचे अंतर पायीच गाठण्याचे ठरवले.




प्रधानमंत्री से करणार तोडगा काढण्याची मागणी

राजस्थान पत्रिकाशी बोलताना या दलातील सदस्य लांबडिया म्हणाले, बेघर झाल्यानंतर आम्ही सरकारकडे घरे देण्याच्या मागणीसाठी उपोषणही केले. पण आमच्या समस्येकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. आता पंतप्रधान मोदींकडे आमची समस्या मांडणार आहोत. ते नक्कीच यावर काहीतरी तोडगा काढतील.


3 अॉक्टोबर 2017 पासून सुरू केला पायी प्रवास

या 27 लोकांनी नवी मुंबईहून 3 ऑक्टोबर 2017 ला दिल्लीला जाण्यासाठी पायीच निघाले. मंगळवारपर्यंत या समुहाने 768 किलोमीटरचे अंतर पार करत ते उदयपूरपर्यंत पोहचले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा