Advertisement

बोरीवलीत हमाल, डबेवाल्यांसाठी वाचनालय


बोरीवलीत हमाल, डबेवाल्यांसाठी वाचनालय
SHARES

बोरीवली रेल्वे स्थानकात नेहमीच धावपळीत असलेल्या हमाल व डबेवाल्यांना काही काळ रेंगाळण्याचं हक्काचं ठिकाण मिळालं आहे. तेही ज्ञानात भर घालणारं. बोरिवली स्थानकात वाचन प्रेरणा दिनाचं निमित्त साधून हमाल आणि डबेवाल्यांसाठी वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं असून या वाचनालयाद्वारे शेकडो पुस्तकांचा खजिना त्यांच्यासाठी खुला झाला आहे.

माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येते. या निमित्ताने बोरीवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे सुरु करण्यात आलेल्या मोफत वाचनालयाचं उद्घाटन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मुंबईच्या डबेवाल्यांना ग्रंथपेटीही भेटस्वरूप देण्यात आली.



हमाल व डबेवाल्यांशी संवाद साधताना विनोद तावडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांच्या 'चकवा चांदणं' या पुस्तकातील काही परिच्छेद वाचून दाखवले. आम्ही नेहमीच ज्ञानेश्र्वरी, पोथीचं वाचन करतो. पण ग्रंथपेटी आणि वाचनालयामुळे आम्हाला विविध साहित्यिकांचे साहित्य एकाच ठिकाणी मिळाल्याची प्रतिक्रिया हमाल आणि डबेवाल्यांनी दिली.

हमाल व डबेवाल्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या वाचनालयासाठी डिंपल प्रकाशन, व्यास क्रिएशन आणि ठाणे व ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांनी पुस्तके उपलब्ध करुन दिली.

यावेळी खा. गोपाळ शेट्टी, हमाल संघटनेचे अध्यक्ष भाऊराव चव्हाण, डबेवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर, माजी अध्यक्ष सोपान मरे, रेल्वेचे डी. के.श्रीवास्तव, बोरीवली रेल्वे स्थानकाचे मिलिंद पवार आदी उपस्थित होते.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा