Advertisement

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसची निदर्शनं


पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसची निदर्शनं
SHARES

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य मुंबईकरांचं कंबरडं मोडलं आहे. संपूर्ण देशात फक्त मुंबईमध्येच पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती सगळ्यात जास्त आहेत. हा मुंबईकरांवर अन्याय असल्याचं सांगत काँग्रेसने सरकारविरोधात एल्गार पुकारला. याचबरोबर चर्चगेट स्थानकाबाहेर पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीत भाजपा सरकारने जी अन्यायकारक वाढ केली आहे त्या विरोधात मुंबई काँग्रेसतर्फे मोठं आंदोलन करण्यात आलं. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.


'यांच्या किमती कमी करा'

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ८१रुपये प्रती लिटर असून डीझेल ६८ रुपये प्रती लिटर आणि घरगुती गॅसची किंमत ७८४ रुपये असून ही मुंबईकरांची पिळवणूक आहे. त्यामुळे भाजपा सरकारने पेट्रोल आणि डीझेलला जीएसटीमध्ये आणावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसकडून करण्यात आली. यामुळे पेट्रोल आणि डीझेल मुंबईकरांना अर्ध्या किमतीत मिळेल आणि मुंबईकरांना दिलासा ही मिळेल, असं संजय निरुपम यांनी स्पष्ट केलं.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. क्रूड ऑईलच्या किंमती वाढणार तेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अजून वाढतील. तसंच आर्थिक अहवालानुसार महागाई अजून वाढण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा विचार केला पाहिजे. मात्र सरकार मुंबईकरांवर अन्याय करत आहे.
- संजय निरुपम, अध्यक्ष मुंबई काँग्रेस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा