Advertisement

डबेवाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश बंदी

काही शाळा प्रशासनांनी घेतलेला हा निर्णय त्यांना मागे घेण्यास सांगावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने केली आहे.

डबेवाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश बंदी
SHARES

शाळेत मुलांना घरचा डबा देण्यासाठी येणाऱ्या डबेवाल्यांना काही कॉन्व्हेंट शाळांच्या प्रशासनाने शाळेत प्रवेश नाकारला आहे. डबेवाल्यांमुळे शाळेची सुरक्षा धोक्यात येत आहे असे कारण देण्यात आले आहे. 

काही शाळा प्रशासनांनी घेतलेला हा निर्णय त्यांना मागे घेण्यास सांगावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

दक्षिण मुंबईतील बहुतांश खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रशासनाने डबेवाल्यांना शाळेत प्रवेश बंदी केली आहे. सुरक्षेचे कारण देत बंदी घालण्यात आली असल्याचे मुंबई डबेवाला असोशिएशनने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सुरक्षेबाबत दिलेले कारण खोटे असून शाळा प्रशासन आणि शाळेतील उपहारगृह (कॅन्टिन) चालक यांचे संगनमत असल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केला आहे. केवळ कॅन्टिनचा व्यवसाय जोरात व्हावा म्हणून प्रशासनाने संगनमताने हा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा पुन्हा नव्याने सुरू होणार आहेत. शेकडो डबेवाले शाळेच्या मुलांचेही डबे पोहचवतात. शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे डबेवाल्यांचा रोजगार बुडला आहे किंवा कमी झाला आहे.

त्यामुळे ज्या विद्यार्थ्याला घरचा डबा खायचा असेल तर अशा विद्यार्थ्याला डबेवाल्यामार्फत शाळेत डबा पोहचवता आला पाहीजे. त्यासाठी शाळा प्रशासनानी घेतलेला हा निर्णय त्यांना मागे घेण्यास भाग पाडले पाहीजे, अशी विनंती संघटनेने मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.हेही वाचा

नवी मुंबई : वंडर्स पार्कमध्ये राईट्सचा अपघात, ६ जखमी

परिस्थितीवर मात करत ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांला 10 वीच्या परिक्षेत यश

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा