Advertisement

'वेस्ट कन्व्हर्टर' यंत्रे नगरसेवक निधीतून द्या!


'वेस्ट कन्व्हर्टर' यंत्रे नगरसेवक निधीतून द्या!
SHARES

मुंबईतील २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवरील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना २ ऑक्टोबरपासून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काढले. त्यामुळे अशा सोसायट्यांमधील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच त्यापासून खत निर्मिती करण्यासाठी 'ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर' यंत्रे बसवण्याची सूचना महापालिका करत आहे. त्यामुळे ही यंत्रे नगरसेवक निधीतून उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.


ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी 

ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर यांसारखी यंत्रे खरेदी करून संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपलब्ध करून देण्याची बाब नगरसेवक निधीच्या वापरासंबंधीच्या निकषांमध्ये अंतर्भूत करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक रोहन राठोड यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मागणी केली आहे.


नगरसेवक निधीतून ही यंत्रे सोसायट्यांना उपलब्ध करून दिल्यास ओल्या कचऱ्याची विल्हेवाट जागीच लागून डम्पिंग ग्राऊंडवर येणाऱ्या कचऱ्याचा ताण कमी होण्यास मदत होईल आणि शून्य कचरा ही संकल्पना प्रभावीपणे राबवता येईल.

- रोहन राठोड, नगरसेवक, भाजपा


मुंबईत कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या बिकट होत चालली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानेही येथील बांधकामांवर निर्बंध घातले आहे. यासाठी आता कचरा जिथून निर्माण होतो, तिथेच अर्थात सहकारी गृहनिर्माण संस्था आणि हॉटेल्स इत्यादी ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतात रुपांतर करणारी ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर यांसारखी यंत्रे वापरल्यास डम्पिंग ग्राऊंडकडे जाणारा कचरा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असे रोहन राठोड यांनी म्हटले आहे.

सध्या नगरसेवक निधीतून १० लिटर आणि २०० लिटर क्षमतेच्या कचरापेट्या वाटप केल्या जात आहेत. त्यामुळे आता भविष्यातील गरज ओळखून ही यंत्रे देण्याची मागणी पुढे होत आहेत. नगरसेवक निधीच्या खर्चासंदर्भात असलेल्या अधिनियमात बदल झाल्यास ही यंत्रे देता येतील, असे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा - 

मुख्यमंत्र्यांना झाडू मारण्यासाठी चकाचक मंडईत टाकला कचरा

सोसायटी कचरामुक्त ठेवा, मिळेल 'एफएसआय'चा लाभ



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा