Advertisement

वॉर रूम मुंबईकरांच्या 'या' समस्यांचेही निराकरण करणार

आता या वॉर रुमच्या मदतीनं फक्त कोविड संबंधितच नाही तर मुंबईकरांच्या इतर समस्याही सोडवल्या जातील.

वॉर रूम मुंबईकरांच्या 'या' समस्यांचेही निराकरण करणार
SHARES

मुंबई शहरातील कोविड (Covid) प्रकरणांमध्ये घट होत आहे. कोरोनाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) वॉर रुम तयार केल्या होत्या. आता या वॉर रुमच्या मदतीनं फक्त कोविड संबंधितच नाही तर मुंबईकरांच्या इतर समस्याही सोडवल्या जातील.

संबंधित वॉर्ड वॉर रूम (War Room) मुंबईकरांना घनकचरा व्यवस्थापन, औषध फवारणी आणि नाले साफसफाई आदी समस्याही सोडवण्यासाठी मदत करेल.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani)  म्हणाले, “शहरात कोविडची कमी प्रकरणं नोंदवली जात आहेत. त्यामुळे वॉर रूममध्ये कमी कॉल येत आहेत. महामारीच्या काळात वॉर्ड वॉर रूम यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईकरांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी या सेवेचा उपयोग करण्याचे ठरवले आहे.”

सुरुवातीला, पालिकेकडे कोविडशी संबंधित समस्यांसाठी समर्पित १९१६ क्रमांक होता. एप्रिल २०२० मध्ये नागरिकांना बेड आणि रुग्णवाहिकेसह मदत करण्यासाठी समर्पित वॉर्ड वॉर रूम सुरू करण्यात आल्या होत्या.

मुंबईत उतरणाऱ्या आंतरराष्ट्रीय (International Flight) प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात आणि त्यांची कोविड चाचणी करण्यातही वॉर रुमनं मदत केली.

काकानी म्हणाले की, वॉर रूम्सनं कोरोनाच्या कामाचे विकेंद्रीकरण केले. “आम्ही कोरोना संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी व्यवस्थापन केले. हेच मॉडेल आता नागरिकांना नाले-गटार साफसफाई, औषध फवारणी, घनकचरा व्यवस्थापन आणि कोविडसह आरोग्याशी संबंधित समस्यांबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात मदत करेल.”

सध्या, शहरात ३४५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी २७६ रुग्ण लक्षणे नसलेले आहेत आणि १९ गंभीर आहेत. २,१५० ICU बेडपैकी, BMC डेटा दाखवतो की ५७ बेड्य व्यापलेले आहेत.

“आजपर्यंत, आमच्याकडे झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये शून्य सक्रिय कंटेनमेंट झोन आणि शून्य सक्रिय सीलबंद इमारती किंवा सूक्ष्म-कंटेनमेंट झोन आहेत. सध्या शहरात ३,६३२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत,” असं पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यानं सांगितलं.

वॉर रूम तीन शिफ्टमध्ये काम करते आणि प्रत्येकामध्ये एक डॉक्टर असतो. टेलिफोन ऑपरेटर प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त, कोविड पीडितांच्या नातेवाईकांना ५० हजार अनुग्रह म्हणून वितरित करण्याच्या पडताळणी प्रक्रियेवर काम करत आहेत.

पालिकेच्या एफ-उत्तर (वडाळा, सायन, माटुंगा) वॉर्ड-वॉर्ड रूमचे व्यवस्थापन करणारे डेटा ऑपरेटर अमित गुरव म्हणाले की, कॉल्सच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

“जानेवारीमध्ये, आम्हाला दिवसाला तब्बल १००० कॉल आले. आता, आम्हाला सरासरी ५० किंवा त्यापेक्षा कमी कॉल येतात. त्यांना आरटी-पीसीआर करण्याची गरज आहे का आणि लक्षणे कोविडशी संबंधित आहेत का हे जाणून घेण्यासाठी लोक अजूनही वॉर रूममध्ये कॉल करतात,” असं ते म्हणाले.



हेही वाचा

माटुंगा, वडाळाला पुराचा तर चेंबूर, गोवंडीला उष्णतेचा धोका: MCAP

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा