Advertisement

गडगंज श्रीमंत 'एमसीए'कडे पैसे नाहीत, मुंबई पोलिसांची १४.२१ कोटींची थकबाकी


गडगंज श्रीमंत 'एमसीए'कडे पैसे नाहीत, मुंबई पोलिसांची १४.२१ कोटींची थकबाकी
SHARES

देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असा नावलौकिक असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे इतरांची देणी देण्यास पैसे नाहीत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अांतरराष्ट्रीय सामन्यांच्या अायोजनासाठी एमसीएनं पोलीस बंदोबस्त मागवला, पण अनेक वर्ष उलटली तरी एमसीएनं मुंबई पोलिसांनी देणी अद्याप भरली नाहीत.


इतकी थकबाकी प्रलंबित

अायसीसी टी-२० विश्वचषकासाठीची पोलीस बंदोबस्तासाठीची ३ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी एमसीएकडे प्रलंबित अाहे. तसंच २०१३ सालची महिला विश्वचषक स्पर्धा तसंच भारत अाणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना अशा अनेक सामन्यांकरिता एमसीएनं पोलीस बंदोबस्त मागवला होता. त्याची एकूण १४.२१ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित अाहे. एमसीएनं अद्याप ही रक्कम भरली नसल्याचं माहिती अधिकारात पुढे अालं अाहे.


इतके भरले?

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच अायपीएल सामन्यांसाठी २००८ ते २०११ पर्यंत मागवलेल्या पोलीस बंदोबस्तासठीचे एकूण ३१ कोटी ६७ लाख ९४ हजार रुपये एमसीएने भरले आहेत. मुंबई क्रिकेट अशोसिएशनने २०११ मध्ये झालेल्या अायसीसी विश्वचषकावेळी पोलीस बंदोबस्त घेतला होता. या बंदोबस्ताचे २ कोटी ६५ लाख रुपये एमसीएने २०१६ मध्ये भरले आहेत.


मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आरटीआयच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी गेल्या पाच वर्षात एमसीएच्या प्रत्येक खासगी कार्यक्रमांसाठी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या सर्व सामन्यांची एकूण १४ कोटी २१ लाख ७४ हजार १७७ रुपये इतकी रक्कम एमसीएकडे बाकी आहे. मात्र इतकी थकबाकी असतानाही मुंबई पोलीस एमसीएच्या प्रत्येक खासगी कार्यक्रमांसाठी चोख बंदोबस्त पुरवत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस कोणाच्या दडपणाखाली ही सुरक्षाव्यवस्था प्रदान करत अाहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


हेही वाचा -

एमसीए तुपाशी पोलीस उपाशी, एमसीएकडून मुंबई पोलिसांना १३.४२ कोटी देणं बाकी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा