Advertisement

एमसीए तुपाशी पोलीस उपाशी, एमसीएकडून मुंबई पोलिसांना १३.४२ कोटी देणं बाकी


एमसीए तुपाशी पोलीस उपाशी, एमसीएकडून मुंबई पोलिसांना १३.४२ कोटी देणं बाकी
SHARES

देशातल्या सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट असोसिएशन असा नावलौकिक असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे देणी देण्यासाठी पैसे नाहीत, असं म्हटलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य अाहे. गेल्या १० वर्षात मुंबईत १७ अांतरराष्ट्रीय सामन्यांचं अायोजन करण्यात अालं. पण सुरक्षा अाणि बंदोबस्ताची जबाबदारी चोखपणे पार पाडणाऱ्या मुंबई पोलिसांचं १३.४२ कोटी रुपयांचं देणं अद्यापही मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) चुकतं केलं नाही.


६२ महिन्यांपासून देणं थकित

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडून गेल्या १० वर्षात एमसीएला पुरवलेल्या पोलीस बंदोबस्ताविषयीची माहिती मागवली होती. सार्वजनिक माहिती अधिकारी अाणि सहाय्यक पोलीस अायुक्त (समन्वयक) तानाजी सुरुलकर यांनी बंदोबस्त विभागाकडून ही माहिती घेत सांगितले की, अायसीसी टी-२० वर्ल्डकप, महिला वर्ल्डकप, कसोटी सामने, सराव सामने अाणि वनडे असे मिळून १७ सामने मुंबईत खेळवण्यात अाले. त्याचे १३.४२ कोटी रुपयांचे थकित देणे एमसीएने अद्याप भरलेले नाहीत. गेल्या ६२ महिन्यांपासून एमसीएने एक रुपयाही भरलेला नाही. त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचं व्याज अाकारण्यात अालेलं नाही.


मुख्यमंत्र्यांनीही घेतली नाही दखल

इंडिया विन स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २००८ ते २०११ दरम्यान पोलीस बंदोबस्तासाठीची ३४ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम मुंबई पोलिसांकडे भरली. मात्र मुंबई पोलिसांनी कोणत्याही प्रकारचं व्याज अाकारलं नाही किंवा त्यांना दंडही सुनावला नाही. अनिल गलगली यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्री अाणि पोलिस अायुक्तांना याविषयी पत्रव्यवहार केला अाहे. पण गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.


पोलिसांकडूनही दबाव नाही

अापलं थकित देणं वसूल करण्यासाठी मुंबई पोलिसांकडूनही कोणतीच पावलं उचलण्यात अाली नाहीत. एमसीए मात्र सामन्यांच्या अायोजनातून बक्कळ पैसा कमावत अाहे. अापण दिलेल्या सेवेचा मोबदला मिळवण्यासाठी पोलिस अायुक्तांकडून अाता एमसीएवर कारवाई करण्याची वेळ अाली अाहे. सामन्याअाधीच किंवा सामना संपल्यानंतर त्वरित बंदोबस्तासाठीची रक्कम वसूल करण्यात यावी, जेणेकरून पैसे रखडले जाणार नाहीत, असं अायुक्तांचं म्हणणं अाहे.


हेही वाचा - 

एमसीएच्या मुंबई टी-२० लीगचा पुन्हा फियास्को? दुसऱ्यांदा मागवल्या संघांसाठी निविदा

प्रवीण अमरे यांचा एमसीएच्या सदस्यपदाचा राजीनामा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा