Advertisement

डबेवाल्यांकडून प्रिन्स हॅरीला मराठमोळा आहेर

येत्या १९ मे रोजी ब्रिटनचा प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा रंगणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी ६०० विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या विवाहसोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी लालबागमधून प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्यासाठी आहेर विकत घेतला आहे.

डबेवाल्यांकडून प्रिन्स हॅरीला मराठमोळा आहेर
SHARES

लंडनच्या राजघराण्यात सध्या शाही लग्नाची लगबग सुरू आहे. या लग्नसोहळ्याची निमंत्रणंही मान्यवरांना पाठवली जात आहेत. अशा या आनंदसोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसलं, तरी शाही घरण्याशी जुने ऋणानुबंध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी वर प्रिन्स हॅरी आणि वधू मेगन मार्कल यांना मराठमोळा आहेर पाठवण्याचं ठरवलं आहे.


कधी आहे लग्न?

येत्या १९ मे रोजी ब्रिटनचा प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मार्कल यांचा शाही विवाहसोहळा रंगणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी ६०० विशेष पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या विवाहसोहळ्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी लालबागमधून प्रिन्स हॅरी व मेगन मार्कल यांच्यासाठी आहेर विकत घेतला आहे.



काय घेतला आहेर?

मेगनसाठी सुंदर नक्षीकाम केलेली पैैठणी साडी, तर प्रिन्स हॅरीसाठी कुर्ता, पायजमा आणि केशरी रंगाचा फेटा अशी पारंपरिक वस्त्रे डबेवाल्यांनी खरेदी केली आहेत. १८ तारखेला ब्रिटिश कॉऊन्सिलच्या ताब्यात हा शाही आहेर देण्यात येईल. 




कशी आहे पैठणी?

डबेवाल्यांनी मेगनसाठी पसंत केलेली पैठणी हिरव्या रंगाची आहे. पैठणीच्या पदरावर मोराचं सुंदर नक्षीकाम केलेेलं आहे. तर, प्रिन्स हॅरीसाठी पाठवण्यात येणार फेटा केशरी रंगाचा आहे.



प्रिन्स चार्ल्स यांनाही आहेर

याआधी प्रिन्स हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नातही डबेवाल्यांनी पैठणी साडी आणि कुर्ता-पायजम्याचा आहेर पाठवला होता. त्याशिवाय प्रिन्स विल्यिम मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही मराठमोळी भेट त्यांना दिली होती.


मुंबईचे डबेवाले आणि लंडनचं राजघराणं यांचं भावनिक नातं आहे. त्यामुळेच राजघराण्यात हा शाही विवाहसोहळा पार पडणार असल्याने आम्ही आहेर म्हणून मराठमोळी पैठणी साडी, कुर्ता-पायजामा आणि फेटा पाठवणार आहे. या आहेरातून मराठी संस्कृतीची झलक दिसून येत असल्याने आम्ही हा आहेर देण्याचे ठरवलं.
- सुभाष तळेकर, प्रवक्ता, मुंबई डबेवाला असोसिएशन



हेही वाचा-

दक्षिण मुंबईतील कॉन्व्हेंट शाळांत डबेवाल्यांना बंदी

राज्यभरात दारूबंदी लागू करा, डबेवाल्यांची मागणी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा