• राज्यभरात दारूबंदी लागू करा, डबेवाल्यांची मागणी
SHARE

मुंबईचे डबेवाले नेहमीच सामाजिक संदेश देत असतात. त्यानुसार मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत 'नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य' यांनी आयोजित केलेल्या आझाद मैदान ते गेट वे अशा व्यसनमुक्ती रॅलीत सहभागी होऊन डबेवाल्यांनी राज्यभरात दारूबंदी लागू करण्याची मागणी केली. या रॅलीत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले देखील उपस्थित होते.सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुफ्फुस, हृदय, जठर, मूत्रपिंड, श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. शिवाय या व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम होऊन मानसिक त्रास होतो. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. व्यसनामुळे शारिरीक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, हानी होते म्हणून माणसाने कोणतेही व्यसन करू नये. हाच संदेश मंगळवारच्या व्यसनमुक्ती रॅलीतून देण्यात आला.

आम्ही फक्त संदेशच देत नाही तर या व्यसनापासून चार हात लांब आहोत. आम्ही वारकरी तुळशीमाळ गळ्यात घालतो. त्यामुळे आम्हाला कोणतेच व्यसन नाही. गुजरात, बिहार या राज्यांत जशी दारूबंदी लागू करण्यात आली आहे, तशीच महाराष्ट्रातही लागू करावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या