Advertisement

लोअर परेल, डॉकयार्डमध्ये कपड्यांच वाटप

लोअर परेल, डॉकयार्ड रोड या भागात राहणाऱ्या काही गरजूंना डबेवाल्यांच्या कपडा बँकेच्यावतीनं मंगळवारी २६ जूनला कपड्यांचं वाटप करण्यात आलं. गेल्यावर्षी डबेवाल्यांनी पुढाकार घेत कपडा बँक नावाचा एक सामाजिक उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमातंर्गत 'आपल्या घरी न वापरातले जुने कपडे डबेवाल्यांना द्या' असं आव्हान केलं होतं.

लोअर परेल, डॉकयार्डमध्ये कपड्यांच वाटप
SHARES

मुंबईचे डबेवाले नेहमीच गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करत असतात. ज्या समाजात आपण रहातो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. याच उद्देशानं डबेवाल्यांनी रोटी आणि कपडा बँक चालू केली होती. या माध्यमातून दररोज हजारो गरजूंना अन्न आणि वस्त्राचा पुरवठा केला जातो. त्या निमित्तानं लोअर परेल, डॉकयार्ड रोड या भागात राहणाऱ्या काही गरजूंना डबेवाल्यांच्या कपडा बँकेच्यावतीनं मंगळवारी २६ जूनला कपड्यांचं वाटप करण्यात आलं.

गेल्यावर्षी डबेवाल्यांनी पुढाकार घेत कपडा बँक नावाचा एक सामाजिक उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमातंर्गत 'आपल्या घरी न वापरातले जुने कपडे डबेवाल्यांना द्या' असं आव्हान केलं होतं. ते कपडे स्वच्छ धुवून, इस्त्री करून कपडा बँकच्या माध्यामातून गरजूंना दान करण्यात येतील. असंही त्यांनी सांगितलं होतं.

रोटी, कपडा आणि मकान या माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. त्या मुलभूत गरजा ओळखून डबेवाल्यांनी रोटी आणि कपडा बँक सुरू केली.

आम्ही हजारो गरजूंना रोटी आणि कपड्याचं दान सध्या करत आहोत. आता राहिला प्रश्न घराचा....आम्हा डबेवाल्यांना राहायला घर नाही तर आम्ही इतरांची काय सोय करणार? त्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की परवडणाऱ्या दरात मुंबईच्या कष्टकरी डबेवाल्यांना घर उपलब्ध करून द्या. असं झाल्यासं, किमान डबेवाल्यांचा घरांचा प्रश्न तरी मिटेल.
- सुभाष तळेकर, प्रवक्ता, डबेवाले संघटना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा