Advertisement

मॉकड्रिल दरम्यान जखमी झालेल्या अग्निशमन जवानाचे निधन

२९ जानेवारी २०२२ रोजी माटुंगा इथल्या भाऊ दाजी रोडवरील श्री. सिद्धी अपार्टमेंटसमोर मॉकड्रील दरम्यान एक अपघात झाला होता.

मॉकड्रिल दरम्यान जखमी झालेल्या अग्निशमन जवानाचे निधन
SHARES

२९ जानेवारी २०२२ रोजी माटुंगा इथल्या भाऊ दाजी रोडवरील श्री. सिद्धी अपार्टमेंटसमोर मॉकड्रील दरम्यान एक अपघात झाला होता. या अपघातात अग्नीशमन दलाचे तीन जवान जखमी झाले होते. त्यातील सदाशिव कर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे निधन झाले आहे.

भायखळा इथल्या अग्निशमन दलाच्या मुख्यालयात (आज) ४ फेब्रुवारी २०२२ रोजी सदाशिव कर्वे यांचे पार्थिव मानवंदना देण्यासाठी आणि अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील भायखळा मुख्यालयात ठेवण्यात आलेल्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतलं.

सदाशिव धोंडीबा कार्वे यांचे वय ५५ होते. वडाळा इथल्या अग्निशमन केंद्रात ते यंत्रसंचालक होते. कार्वे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.

मुंबईतील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर सातारा इथल्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा

कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्यात संपणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राणीच्या बागेसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ११५ कोटी रुपयांची तरतूद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा