Advertisement

कोरोना आरोग्य केंद्रातील ३५२० बेड्सचं लोकार्पण

मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध कोरोना केंद्रातील ३५२० बेड्सचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

कोरोना आरोग्य केंद्रातील ३५२० बेड्सचं लोकार्पण
SHARES

मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व बीकेसी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध कोरोना केंद्रातील ३५२० बेड्सचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. हे बेड्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत.


यापैकी मुलुंड येथील केंद्रामधील महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या (सिडको) रूग्णांसाठी १७०० बेड असतील. तर त्यातील ५०० बेड ठाणे महानगरपालिकेसाठी राखीव असतील.


दहिसर पूर्व येथील कोरोना केंद्रात ९०० बेड्स आहेत. हे कोरोना केंद्र मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. तर दहिसर पश्चिम येथील कंदरपाडा येथे १०० बेडचे केंद्र असून ते आयसीयू सुविधांनी सुसज्ज आहे. 


या केंद्रांचे उद्घाटन आदित्य ठाकरे, असलम शेख, किशोरी पेडणेकर, इक्बालसिंग चहल, सिडकोचे एमडी लोकेश चंद्र आणि एमएमआरसीएलचे एमडी रणजितसिंग देओल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णयRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा