Advertisement

गोखले पूलाचा महुर्त पुन्हा टळला, आता 'या' तारखेला होणार उद्घाटन

पहिल्या गर्डरचे काम अत्यंत जोखमीचे असून रेल्वेवर कधी आणि किती ब्लॉक घ्यायचे याबाबत सविस्तर चर्चा झाली.

गोखले पूलाचा महुर्त पुन्हा टळला, आता 'या' तारखेला होणार उद्घाटन
SHARES

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरील एकेरी वाहतूक सुरू करण्याचे वेळापत्रक आणखी चार महिन्यांनी लांबले आहे. पुढील काही दिवसांत वाहतूक सुरू होणे अपेक्षित असताना, आता 15 फेब्रुवारी 2024 ही नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी वाहतूककोंडीतून सुटका होण्याची पश्चिम उपनगरातील प्रवाशांची आशा मावळली आहे.

पुलाचा गर्डर टाकण्याच्या कामाचे नियोजन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), पश्चिम रेल्वेचे अधिकारी तसेच सल्लागार आणि कंत्राटदार कंपन्यांची बुधवारी बैठक झाली. गर्डर्स बसवण्याचे काम राईट्स नावाच्या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे. 

बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना रेल्वे रुळावर बीम टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेवर मोठा ब्लॉक घेण्याची विनंती केली. याला रेल्वेनेही दुजोरा दिला आहे. पहिल्या गर्डरचे काम अत्यंत जोखमीचे असून रेल्वेवर कधी आणि किती ब्लॉक घ्यावेत याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी घेतलेल्या ब्लॉकबाबतची माहिती आणि रेखाचित्रे लवकरात लवकर सादर करावीत, अशी सूचना केली. गर्डर बसवल्यानंतर, त्यावर पट्ट्या टाकल्यानंतर, काँक्रिटीकरण आणि क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर मस्तकीचे काम करावे लागते. एकूणच पुलाचे आवश्यक काम पूर्ण होण्याचा कालावधी पाहता 15 फेब्रुवारी 2024 असेल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पुलाच्या कामात 7.5 मीटर उंचीवरून गर्डर खाली करण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग असेल. साधारणपणे गर्डर एका तासाच्या ब्लॉकमध्ये फक्त 15 सेमी कमी करता येतो. त्यामुळे 1300 टन वजनाचा गोखले पुलाचा महाकाय गर्डर 7.5 मीटरपर्यंत खाली करण्यास आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने ब्लॉकची मुदत वाढवून देण्याची विनंती केली आहे. 

गोखले पूल धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी एक बाजू सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, अत्यंत किचकट असलेल्या या कामात अनेक अडचणींमुळे ते वेळेत पूर्ण झाले नाही. त्यानंतर दिवाळीपूर्वी किंवा नोव्हेंबरमध्ये साईड सुरू करण्याचे टार्गेट होते.



हेही वाचा

वडाळा रोड स्थानकाचा होणार कायापालट

गोरेगाव आग दुर्घटना: झोपू इमारतींमधील लिफ्टला जाळीचे दरवाजे नको

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा