Advertisement

'रहिवासी भागात फटाक्यांची विक्री नकोच' - उच्च न्यायालय

रहिवासी भागात फटाके विक्रीस पूर्णत: बंदी करा, ज्यांचे परवाने निवासी भागात आहेत, त्यांचे परवाने तातडीने रद्द करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.

'रहिवासी भागात फटाक्यांची विक्री नकोच' - उच्च न्यायालय
SHARES

अनधिकृत फटाके स्टाॅल आणि निवासी भागातील फटाके स्टाॅल संबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वत्र लागू करा. रहिवासी भागात फटाके विक्रीस पूर्णत: बंदी करा, ज्यांचे परवाने निवासी भागात आहेत, त्यांचे परवाने तातडीने रद्द करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.


लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी

मुख्य न्या. मंजुला चेल्लूर यांनी हे आदेश दिले असून या आदेशांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, असंही न्यायालयाने सरकारला बजावलं आहे.



नवीन परवाने देऊ नका

नवीन परवाने न देताना फटाके विक्रीसाठी यापूर्वी जे परवाने जारी केलेत ते ५० टक्क्यांपर्यंत खाली आणा, या सर्व प्रक्रियेवर पोलिसांनी लक्ष ठेवून त्यांच्या अधिकारानुसार तातडीने फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करावी, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


मालाडमधील फटाका विक्रेत्यांची मागणी 

मालाड भागातील फटाक्यांची दुकाने अनेक वर्षे जुनी असून ती पुन्हा सुरु करण्याकरीता आम्हाला परवानगी द्यावी अशी विनंती 'मालाड फायर वर्कस वेल्फेअर असोसिएशन'ने न्यायालयात केली होती. न्यायालयाने त्यांची विनंती देखील अमान्य केली आहे.



हेही वाचा -

दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेबंदी?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा