Advertisement

सनबर्नला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील


सनबर्नला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
SHARES

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अल्पवयीन मुलांना दारू पिऊ न देण्याचं अाश्वासन दिल्यानंतर अाता उच्च न्यायालयानंही सनबर्न फेस्टिव्हलला हिरवा कंदील दाखवला अाहे. मात्र काही अटींचं पालन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं अायोजकांसह सरकारला दिले अाहेत.


सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अल्पवयीन मुलंही सहभागी होत असून त्यांना मद्य पिण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अाली होती. त्यामुळे अल्पवयीन मुला-मुलींना मद्य प्राशन करू दिलं जाणार नाही, अशी हमी अायोजकांसह सरकारनं दिल्यानंतरच कोर्टानं या फेस्टिव्हलच्या अायोजनाचा मार्ग मोकळा केला अाहे.


नियमांचं पालन करण्याचे निर्देश

फेस्टिव्हलदरम्यान नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश कोर्टानं अायोजकांना दिले अाहेत. तसं न झाल्यास, तो कोर्टाचा अवमान असल्याचं समजून पुढच्या वेळी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयानं दिला अाहे. ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्याचे अादेशही न्यायालयानं दिले अाहेत.


१५० सीसीटीव्ही, ३०० सुरक्षारक्षक

पुण्यात २८ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान सनबर्न महोत्सव अायोजित करण्यात अाला असून त्याला ३ लाख जणांची उपस्थिती लाभणार अाहे. यावेळी १५० सीसीटीव्ही कॅमेरे अाणि ३०० सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार अाहेत. तसंच साध्या वेशातील पोलीसही नेमण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं सरकारकडून न्यायालयात सांगण्यात अालं.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा