मालाडमध्येच इतकी गर्दी का? याचं ‘हे’ आहे उत्तर...

मुंबई शहर जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलं आहे. संयुक्त राष्ट्र (UN)च्या ‘हॅबिटेट डेटा २०१८-१९’ या सर्वेक्षण अहवालानुसार मुंबईत प्रति चौ.कि.मी. क्षेत्रफळावर तब्बल २६,४५३ लोकं राहतात.

मालाडमध्येच इतकी गर्दी का? याचं ‘हे’ आहे उत्तर...
SHARES

मुंबई शहर जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलं आहे. संयुक्त राष्ट्र (UN)च्या ‘हॅबिटेट डेटा २०१८-१९’ या सर्वेक्षण अहवालानुसार मुंबईत प्रति चौ.कि.मी. क्षेत्रफळावर तब्बल २६,४५३ लोकं राहतात. तर मुंबईची लोकसंख्या १२.७८ दशलक्ष एवढी आहे.  

 बांग्लादेश पहिल्या क्रमांकावर

‘संयुक्त राष्ट्र’च्या ‘हॅबिटेट डाटा’नुसार पहिल्या क्रमांकावर बांग्लादेशची राजधानी ढाका हे शहर आहे. ढाक्यात प्रति चौ.कि.मी. क्षेत्रफळावर ४४,५०० लोकं राहतात. त्यापाठोपाठ मुंबईचा क्रमांक येतो. तर तिसऱ्या क्रमांकावर कोलंबियातील मेडेलिन हे शहर आहे. या शहरात एक चौरस कि.मी. क्षेत्रफळावर १९,७०० लोकं राहतात.  

मालाडमध्ये सर्वाधिक लोकसंख्या

मुंबईत तर सर्वच ठिकाणी गर्दीच गर्दी दिसून येते. तरीही मुंबईच्या मालाड या उपनगरात सर्वाधिक लोकं राहात असल्याचं या आकडेवारीवरून पुढं आलं आहे. मालाडमध्ये ९,६७,०९४ लोकं राहात असून सर्वात कमी लोकं बी वाॅर्डातील डोंगरी परिसरात रहात असल्याचं हा अहवाल सांगतो. डोंगरीत एकूण १,३०,७६९ लोकं राहतात. हेही वाचा-

आरजे मलिष्का नवरीच्या वेशात रस्त्यांवर का फिरतेय? पाहा धक्कादायक व्हिडिओ

आरेतील जमीन हडपण्याचा डाव, ‘वंचित’ची सरकारवर टीकासंबंधित विषय