Advertisement

आरेतील जमीन हडपण्याचा डाव, ‘वंचित’ची सरकारवर टीका

मेट्रो ३ साठी कारशेड उभारण्याच्या नावाखाली आरे काॅलनीतील जमीन गिळंकृत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर केला आहे.

आरेतील जमीन हडपण्याचा डाव, ‘वंचित’ची सरकारवर टीका
SHARES

मेट्रो ३ साठी कारशेड उभारण्याच्या नावाखाली आरे काॅलनीतील जमीन गिळंकृत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर केला आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचितने आरेतील झाडाच्या कत्तलीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

मुंबईकरांचा विरोध कशासाठी?

वंचितचे प्रवक्ते अरूण सावंत म्हणाले की, सद्यस्थितीत शहरात ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मुंबईकरांना ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, वाहतूककोंडी इ. त्रासाचा सामना करावा लागत आहे. हा सगळा त्रास सहन करून देखील मुंबईकर मेट्रोच्या कामांना पाठिंबा देत आहेत. असं असताना मुंबईकर आरेतील झाडांच्या कत्तलीला विरोध कशासाठी करत आहेत, हे देखील सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. 


आरे जंगल कसं नाही?

आरेत कारशेड उभारता आलं नाही, तर मेट्रो ३ चं कामंच पुढं सरकू शकत नाही, असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आरेत ४१ बिबट्यांचं वास्तव्य असताना आरे जंगल नाही, असा दावा करणं चुकीचा आहे. आरेत आदिवासींच्या जमिनी देखील मोठ्या प्रमाणात आहे. असं असूनही सरकार मुंबईकरांचं न ऐकता जबरदस्तीने आरेत कारशेड उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. पुढं काही वर्षांनी या कारशेडच्या आजूबाजूची जमीन देखील बिल्डरांच्या घशात घातली जाईल, असा आरोपही वंचितने केला. 



हेही वाचा-

महापालिकेने वर्षभरात मुंबईत लावली ‘इतकी’ झाडं, आकडेवारी आली समोर

अमिताभ बच्चन यांचा मेट्रोला पाठिंबा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा