कामगार नेते दादा सामंत यांचे निधन


कामगार नेते दादा सामंत यांचे निधन
SHARES
जेष्ठ कामगार नेते दादा सामंत यांचं आज मुंबईत बोरीवली इथं  निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ.दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. तर गृहनिर्माण मंञी जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे होते. त्यांच्या या अकाली जाण्याने कामगार चळवळीचा आणखी एक तारा  अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर दादा सामंत यांनी १९९७ ते २०११ पर्यंत कामगार आघाडी आणि संलग्न कामगार संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. १९८१ च्या गिरणी संपानंतर ग्वाल्हेर इथल्या गिरणीतली नोकरी सोडून ते दत्ता सामंत यांच्यासोबत कामगार चळवळीत सक्रीय झाले. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 
त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी प्रमोदीनी आणि तीन मुली गीता निता, रुता, जावई आणि नातवंड असा परिवार आहे. दादांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांनी माञ या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. कुर्लाच्या नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या दादा सामंतांचे जुने घर पूर्नविकासात गेले. त्या ठिकाणी पूर्नविकासाचे काम 15 वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या बोरिवली पूर्व येथील अभिनव नगर सोसायटीतील निवासस्थानी राहात होते. कामगार कायद्याविषयी त्यांचा चांगला अभ्यास होता.दादा सामंत यांच्या निधनामुळे, कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे नेतृत्व काळाच्या पडाद्याआड गेलं असल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित विषय