Advertisement

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?

सामान्य प्रवाशांना अद्याप लोकल प्रवासास मान्यता देण्यात आलेली नाही. लोकल प्रवास बंद असल्यानं अनेकांना त्याचा मोठा त्रास सहन कारावा लागतोय.

लसीकरण पुर्ण झालेल्यांना मिळणार लोकल प्रवासाची परवानगी?
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र सामान्य प्रवाशांना अद्याप लोकल प्रवासास मान्यता देण्यात आलेली नाही. लोकल प्रवास बंद असल्यानं अनेकांना त्याचा मोठा त्रास सहन कारावा लागतोय. परिणामी खाजगी वाहतुकीनं प्रवास करावा लागत असून, खिशाला कात्री लागते. दरम्यान, सामान्यांना होणारा त्रास लक्षात घेत अनेक स्थानिक नेत्यांसह काही पक्षांनी लोकल प्रवासास मान्यता देण्याची मागणी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन डोस झालेल्या नागरिकांना लोकल (mumbai local) प्रवास देण्याकरीता उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्य सरकारमधील इतर अधिकारी या विषयांवर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय 'याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार असून, ज्यांचे २ डोस पुर्ण झाले आहेत त्यांनाच लोकल प्रवास करण्याची परवानगी मिळू शकते', असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रासार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केलं जात आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक जालीम उपाय आहे. त्यामुळं ज्या नागरिकांचे २ डोस पुर्ण झाले आहेत, त्यांना लोकल प्रवासास परवानगी द्यावी अशी जनहीत याचिका मुंबईतील एका सीएनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लोकल प्रवासास मान्यता देण्याची मागणी केली.



हेही वाचा -

राज्याला ड्रायव्हर नको, जनतेचं हित बघणारा मुख्यमंत्री हवाय- नारायण राणे

सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारले


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा