
महाराष्ट्र (maharashtra) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी (MMR) गृहनिर्मितीला मोठी चालना देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने 2047 पर्यंत 30 लाख परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
प्रस्तावित 30 लाख परवडणाऱ्या घरांपैकी सुमारे 10 लाख घरे मुंबईत (mumbai) बांधली जातील; यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे (SRA) सहा लाख आणि म्हाडा (MHADA) व इतर गृहनिर्माण योजनांद्वारे चार लाख घरांचा समावेश असेल.
जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी 'एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली' (UDCPR) हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
तसेच राज्य सरकारकडून वृद्धाश्रमांसाठी अतिरिक्त एफएसआय (FSI) जाहीर करण्यात आले आहे.
सरकार 'क्लस्टर पुनर्विकासा'लाही (समूह पुनर्विकास) प्रोत्साहन देत आहे, ज्यामध्ये डिजिटल ग्रंथालये, सामुदायिक सभागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महिला सक्षमीकरण केंद्रे यांसारख्या नागरी सुविधांचा समावेश असेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'थर्ड मुंबई'च्या (तिसरी मुंबई) योजनांचीही रूपरेषा मांडली; हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीए (JNPA) आणि समृद्धी महामार्ग यांच्या आसपासचा एक मोठा विकास विभाग असेल.
या प्रकल्पात एरोसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एज्युसिटी आणि आयटी-फिनटेक हब यांसारख्या विशेष क्षेत्रांचा समावेश करण्याची संकल्पना आहे.
हेही वाचा
