Advertisement

पुरंदरे मैदान स्थानिकांसाठीचं खुलंच, महापालिका अधिकाऱ्यांचं आश्वासन

नायगाव येथील पुरंदरे मैदानात केईएमच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येत आहे. परंतु जिमखाना बांधल्यानंतर आपल्याला या मैदानाचा वापर करता येणार नाही, असं वाटत असल्याने स्थानिकांचा या बांधकामाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर महापौर महाडेश्वर यांनी या मैदानाची पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा केली.

पुरंदरे मैदान स्थानिकांसाठीचं खुलंच, महापालिका अधिकाऱ्यांचं आश्वासन
SHARES

पुरंदरे मैदानात डॉक्टरांसाठी जिमखाना बनवण्यात येणार आहे. त्यामुळे या मैदानात स्थानिकांना खेळण्यासाठी मिळणार नाही, अशी भीती रहिवाशांना वाटत होती. त्यामुळे रहिवाशांना दिलासा देण्यासाठी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या मैदानाला भेट दिली. या भेटीनंतर महापालिका संचालकांनी जिमखाना उभारल्यानंतरही मैदान स्थानिकांना खेळण्यासाठी खुलंच राहिल, असं आश्वासन दिलं.


काय आहे प्रकरण?

नायगाव येथील पुरंदरे मैदानात केईएमच्या विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बांधण्यात येत आहे. परंतु जिमखाना बांधल्यानंतर आपल्याला या मैदानाचा वापर करता येणार नाही, असं वाटत असल्याने स्थानिकांचा या बांधकामाला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर महापौर महाडेश्वर यांनी या मैदानाची पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा केली.

यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, स्थापत्य समिती शहर अध्यक्षा अरुंधती दुधवडकर, स्थाानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे, अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागाचे संचालक विनोद चिठोरे, मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्ते पराग मसुरकर, एफ-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्ता किशोर देसाई तसंच परिसरातील स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



संयुक्त बैठकीचा प्रस्ताव

महाडेश्वर यांनी स्थानिकांच्या समस्या सर्वप्रथम ऐकून महापालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधला. विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या सूचनांचं पत्र वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णांलयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांना सादर केलं. त्यावर माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन चर्चेद्वारे हा प्रश्न निकाली काढण्याची सूचना महापौरांनी संबधित अधिकाऱ्यांना केली. तसंच प्रस्‍तावित बांधकामाचा नकाशा मैदानाच्या दर्शनी भागात लावून नागरिकांचा गैरसमज दूर करावा, अशी सूचनाही महापौरांनी केली.


जिमखाना कशासाठी?

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांसाठी जिमखाना बनविणं आवश्यक आहे. त्यानुसार या मैदानाच्या १० टक्केे भागावर नियमाप्रमाणे बांधकाम करण्यात आल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितलं. त्याचप्रमाणे स्थाानिकांना या मैदानावर खेळण्यांसाठी कोणत्याही प्रकारची आडकाठी करण्यात येणार नसून जी जागा त्यांना खेळण्यासाठी राखीव करण्यात आली आहे, त्या जागेवर खेळण्यास काहीही हरकत नसल्याचंही महापालिका अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

महापौरांना कधी देणार निवासस्थान?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा