Advertisement

महापौरांना कधी देणार निवासस्थान?

मध्य वैतरणा येथील जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढं मंजुरीला आला असता सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचं काय झालं? असा सवाल प्रशासनाला केला.

महापौरांना कधी देणार निवासस्थान?
SHARES

मुंबईच्या महापौरांच्या निवासस्थानाचा तिढा अद्यापही सुटला नसून महापौरांना निवासस्थान कधी देणार? असा सवाल करत पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाने प्रशासनाला धारेवर धरलं आहे. विद्यमान महापौरांचा कालावधी संपण्याची प्रशासन वाट पाहतेय का? असा सवाल सत्ताधारी पक्षाने करून दराडे कुटुंबाला २०२८ पर्यंत राहण्यासाठी परस्पर बंगला देण्याचं सरकारला अधिकार काय? असाही सवाल त्यांनी केला.


सभागृहनेत्यांचा सवाल

मध्य वैतरणा येथील जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढं मंजुरीला आला असता सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी महापौरांच्या पर्यायी निवासस्थानाचं काय झालं? असा सवाल प्रशासनाला केला.



दराडे कुटुंबाला प्राधान्य

मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना शिवाजी पार्क येथील निवासस्थान सोडावं लागणार आहे. परंतु त्यांच्या पर्यायी निवासस्थानाची व्यवस्था प्रशासन करत नाही. जलअभियंत्याच्या ज्या बंगल्यात महापौरांचे निवासस्थान करण्यात येणार होतं, तिथे सनदी अधिकारी प्रविण आणि पल्लवी दराडे कुटुंब राहत आहेत. सरकारनं त्यांना २०२८ पर्यंत तिथं राहण्याची परवानगी दिली आहे.


मग बिघडलं कुठं?

एवढं काय तर महापालिकेचा एक अधिकारी सरकारी बंगल्यात राहतोय तर मग आमचा एक अधिकारी महापालिकेचा बंगल्यात राहिला तर बिघडलं कुठं? असा सवाल केला जात असल्याचं राऊत यांनी सांगितलं. दराडे कुटुंब राहत असलेल्या या बंगल्याची पाहणी करण्यात यावी, अशी मागणी सपाचे रईस शेख यांनी केली.


जिमखान्याच्या जागेवर

महापौरांच्या निवासस्थानासाठी ज्या बंगल्याची मागणी होतेय त्याचं आकारमान काय? असा सवाल करत भाजपाच्या मनोज कोटक यांनी महापौरांचं निवासस्थान हे महालक्ष्मी येथील अधिकाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेवर बांधण्यात यावा ही आपली मागणी पहिल्यापासून असल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

महापौरांना निवासस्थान न मिळाल्यास... शिवसेना नगरसेवकांचा इशारा

मन की बात करणारे धन की बात करताहेत: महापौरांचा भाजपाला टोला



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा