मुलुंडमध्ये सुरक्षारक्षकाला चावला साप

 Mulund
मुलुंडमध्ये सुरक्षारक्षकाला चावला साप
Mulund, Mumbai  -  

मुलुंड - सुरक्षारक्षकाला सर्पदंश झाल्याने एलबीएस रोड येथील वाणी विद्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलुंड (प.) येथील आरएच भोजराज रोड येथे वाणी विद्यालयाची जुनी इमारत आहे. परंतु दुरुस्तीच्या कामामुळे ही शाळा तात्पुरती एलबीएस रोड येथे हलवण्यात आली. गुरुवारी या शाळेमधील यशवंत घोडे या सुरक्षारक्षकास शाळेतील प्रांगणातच सर्पदंश झाला. त्यानंतर 'रेस्क्यू असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर' या संस्थेने शाळेत साप शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु साप सापडलाच नाही. या घटनेमुळे भयभीत होऊन शनिवारी 250 पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापक डॉली हेन्री यांची भेट घेत पुन्हा जुन्याच इमारतीत शाळा सुरू करण्याची मागणी केली. यावर पुढील वर्षीची शाळा जुन्याच इमारतीमध्य होईल असे आश्वासन शाळेच्या मुख्यध्यापकांनी दिले. तोपर्यंत त्या शाळेच्या दुरुस्तीचे काम देखील पूर्ण होईल अशीही त्यांनी माहिती दिली.

घोडे यांना उपचारासाठी अगरवाल रुग्णालयात नेण्यात आले होते. सुदैवाने साप बिनविषारी असल्याचे उपचारादरम्यान लक्षात आले. एलबीएस रोड लगतच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तेथूनच हा साप आला असल्याचा प्रथम अंदाज व्यक्त केला जातोय.

Loading Comments