Advertisement

कर थकवणाऱ्या ३३९२ मालमत्ता पालिकेकडून जप्त

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.

कर थकवणाऱ्या ३३९२ मालमत्ता पालिकेकडून जप्त
SHARES

मालमत्ता कर (property tax) थकवणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेने मागील एका आठवड्यात ३३९२ मालमत्ता जप्त (seized) केल्या आहेत. या मालमत्तांनी १३७६ कोटी रुपयांचा कर थकवला आहे. याशिवाय २६९ कोटींपेक्षा अधिकची थकबाकी असणाऱ्या २१३ मालमत्तांची जलजोडणी खंडीत तोडण्यात आली आहे

मालमत्ता कराची (property tax) वसुली अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पालिकेचे आर्थिक गणित डळमळीत झाले आहे. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे.  मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या घरातील फर्निचर (furniture), टीव्ही (tv), फ्रीज (freeze) आदी वस्तू पालिका (Mumbai Municipal Corporation)  जप्त करत आहे. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी कर भरण्यास सुरूवात केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ४ लाख ५० हजार मालमत्ता धारक असून यामध्ये १ लाख २७ हजारांपेक्षा अधिक मालमत्ता निवासी आहे. यामध्ये १२ हजार १५६ भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात ५५०० कोटींचा मालमत्ता कर मिळवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ३१५४ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारताच अनेकांनी मालमत्ता कर (property tax) भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रोज १० कोटींची होणारी वसुली आता ४० ते ५० कोटींवर गेली आहे. गेल्या आठवड्याभरातच ३५० कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे. मात्र, तरीही अनेक थकबाकीदारांकडून अद्याप कराची वसुली झालेली नाही. 



हेही वाचा -

एलबीएस मार्गावरील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचा धडाका

काॅन्स्टेबल शिंदेंची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा