काॅन्स्टेबल शिंदेंची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

शिंदेच्या हत्येनंतर आरोपींना दया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने कुरेशी याला शिक्षा सुनावताना प्रामुख्याने नमूद केले

काॅन्स्टेबल शिंदेंची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
SHARES

वांद्रे येथील पेट्रोलपंपवर वाहतूक पोलिस शिपाई विलास शिंदे यांनी कारवाई केल्याच्या रागातून त्यांची हत्या केलेल्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अहमद अली मोहम्मद अली कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. शिंदेच्या हत्येनंतर आरोपींना दया दाखवल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने कुरेशी याला शिक्षा सुनावताना प्रामुख्याने नमूद केले.

 २०१६ मध्ये विलास शिंदे हे  खारमधील एस व्ही रोडवरील मॅक्लॉइड पेट्रोलपंपाजवळ वाहतूक पोलिस म्हणून विलास शिंदे कर्तव्य बजावत होते.  शहरातील २०१३ सालच्या वाहनांविषयीची माहिती वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. विलास शिंदे २३ ऑगस्ट रोजी हेच काम करत होते. या दरम्यान त्यांना पेट्रोलपंपावर आलेला दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. शिंदेंनी तातडीने त्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला थांबवले आणि पहिले गाडीची चावी काढून घेतली. त्यांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराला परवाना आणि गाडीची कागदपत्रे मागितली. यानंतर त्या दुचाकीस्वाराने स्वतःच्या मोठ्या भावाला बोलावून घेतले. अल्पवयीन दुचाकीस्वाराचा २० वर्षांचा भाऊ अहमद मोहम्मद अली कुरेशी घटनास्थळी आला. त्याने शिंदे यांच्या हुज्जत घालायला सुरुवात केली. यादरम्यान कुरेशीने स्वतःसोबत आणलेल्या बांबूने विलास शिंदे यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यांच्याकडून गाडीची चावी खेचून पळ काढला. या हल्यानंतर शिंदेंवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पाच दिवसानंतर शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शिंदे कुटुंबियांना सरकारने २५ लाखांची मदत जाहिर केली होती. तर मुलगा दिपेश शिंदे याला पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर नोकरी देण्यात आली होती. 

 या प्रकरणी पोलिसांनी कुरेशी आणि त्याचा भावाला अटक केली होती. घटनेच्या वेळी कुरेशीच्या भावाचे वय १६ वर्षे होते. परंतु त्याच्यावर सजाण गुन्हेगार म्हणून खटला चालवण्यास बाल न्याय मंडळाने परवानगी दिली होती. खून व बलात्काराच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींवर सजाण म्हणून खटला चालवण्यास २०१६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्याचनुसा कुरेशीच्या भावावरही सजाण म्हणून खटला चालवण्यात परवानगी दिली गेली आहे. शिंदे यांच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. एम. जयस्वाल यांनी कुरेशी याला शुक्रवारी दोषी ठरवले होते.

हेही वाचाः- गॅस सिलिंडरच्या दरात कपात

हेही वाचाः- आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला,महानगर पालिका निवडणूका एकत्र लढवणार ?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा