Advertisement

मुंबई: 13 वॉर्ड्समध्ये कबुतरखाना उभारण्याचा प्रस्ताव गुंडाळला

मुंबईत 51 कबुतरखाने आहेत. मात्र, विधान परिषदेतील चर्चेनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार काही कबुतरखाने बंद करण्यात आले.

मुंबई: 13 वॉर्ड्समध्ये कबुतरखाना उभारण्याचा प्रस्ताव गुंडाळला
SHARES

मुंबईतील 25 वॉर्ड अधिकाऱ्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि महापालिका आरोग्य विभागाला सादर केला आहे. 25 पैकी 12 वॉर्डांमध्ये 13 ठिकाणी नवीन कबुतरखाने तयार करण्याचा अहवाल महापालिकेला सादर झाला आहे.

उर्वरीत 13 वॉर्डांमध्ये जागाच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात नऊ मुंबई शहरातील तर चार उपनगरातील वॉर्ड आहेत.

मुंबई (mumbai) शहरात लोकवस्तीपासून 500 मीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर नवे कबुतरखाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई महापालिकेने (bmc) 25 पैकी 12 वॉर्डात नवीन कबुतरखाने सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. हे सर्व वॉर्ड उपनगरांतील आहेत.

शहरात जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत येथील सर्व वॉडांनी कबुतरखाने सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यामुळे कबुतरखान्यांचा भार उपनगरांवर (suburban) पडण्याचे संकेत आहेत.

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून कबुतरखान्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेने कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे किंवा कसे यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत.

याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसताना महापालिकेच्या सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावर नवीन कबुतरखाने उघडण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी केल्या होत्या.

या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने कबुतरखाना तयार करण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याचे या 13 वॉर्ड अधिकाऱ्यांनी अहवालातून सांगितले आहे.

कबुतरखान्यांसाठी जागा नसलेल्या वॉर्डमध्ये मुंबई शहरातील ए, बी, सी, डी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण वॉर्डचा समावेश आहे. तर पश्चिम उपनगरातील एच पूर्व, के पूर्व, पी उत्तर, आर दक्षिण वॉर्डचा समावेश आहे.

एस वॉर्डमध्ये दोन ठिकाणी नवीन कबूतरखाने तयार करण्याचा अहवाल सादर केला आहे. हे कबुतरखाने (pigeon house) संस्थांमार्फत तयार करण्याचे नियोजन आहे. तसेच त्याला महापालिकेचे पाठबळ मिळणार आहे.

यासंदर्भात लवकरच बैठकही होणार आहे. याआधीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे नवीन कबुतरखाना तयार झाला आहे. मुंबईत 51 कबुतरखाने आहेत. मात्र, विधान परिषदेतील चर्चेनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार काही कबुतरखाने बंद करण्यात आले.

मात्र, कबुतरखान्यांबाबत तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून यावर अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रातील पहिला क्रिप्टोकरन्सी सायबर सेल 'इथे' सुरू

दादर कॉम्प्लेक्समधील रहिवासी दूषित पाण्याने त्रस्त

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा