Advertisement

कोरोना मृतांच्या आकडेवारीची नोंद आता गुगल फॉर्मवर

मुंबई महापालिका मृतांची नोंद ठेवण्यासाठी आता गुगल फॉर्मचा वापर करणार आहे.

कोरोना मृतांच्या आकडेवारीची नोंद आता गुगल फॉर्मवर
SHARES

मुंबई महापालिका मृतांची नोंद ठेवण्यासाठी आता गुगल फॉर्मचा वापर करणार आहे. कोरोनाबाधित आणि मृत रुग्णांची माहिती ४८ तासांच्या आत पालिकेला कळवणं रुग्णालयांना बंधनकारक आहे. जी रुग्णालये याचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाईही करण्यात येणार आहे.

कोरोनाबाधित  आणि मृतांच्या आकडेवारीत पालिकेकडून तफावत होत असल्याचे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर गुगल फॉर्मवर मृतांच्या आकडेवारीची नोंद पालिकेकडून ठेवली जाणार आहे. मुंबईतील प्रत्येक मृत्यूंची नोंद पालिकेला करण्यास राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे पालिकेला प्रत्येक मृत्यूची ादी तयार करून ती राज्य सरकारकडे सुपूर्द करावी लागणार आहे. पालिकेला प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची माहिती त्याच्या पत्त्यासह विभागनिहाय द्यायची आहे.

पालिकेने अगोदरच्या मृत्यूची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. १७ जून रोजी ८६२ मृत्यूची नोंद केली आहे. लवकरच सर्व जुन्या मृत्यूंची नोंद पालिकेकडून केली जात आहे. २८ जून रोजी २३ मृत्यू झाले. तर याच दिवशी जुन्या ६४ मृत्यूंची नोंदही करण्यात आली. २९ जून रोजी २१ मृत्यू झाले मात्र यादविशी ७१ मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर, ३० जूनला ३६ मृत्यू झाले, त्यादिवशी ५६ जुन्या मृत्यूची नोंद झाली तर १ जून रोजी ६ मृत्यू झाले असून ६९ जुन्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 



हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा