Advertisement

५ वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा; मुंबईतील वायूप्रदूषणात घट


५ वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा; मुंबईतील वायूप्रदूषणात घट
SHARES

मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबईतील वायुप्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मुंबईनं मंगळवारी ५ वर्षांतील सर्वांत शुद्ध हवा अनुभवल्याचा दावा 'सफर'नं केला आहे. हवेच्या गुणवत्तेत मुंबईनं लंडन, सिंगापूर, टोक्यो, सिडनी या शहरांनाही मागं टाकल्याची माहिती समोर आली आहे. रात्रभर पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा अनुभव सध्या मुंबईकर घेत आहेत. त्यातच मंगळवारी मुंबईत प्रदूषणाची सर्वांत कमी पातळी नोंदवण्यात आली. वायू गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) २०१५ नंतर सर्वाधिक शुद्ध हवेत मुंबईकरांनी श्वास घेतला.

मंगळवारी मुंबईचा एक्यूआय ११ आणि न्यूयॉर्कचा एक्यूआय १० होता. त्यानुसार लंडन (२१), टोकियो (५२), सिडनी (२५), सिंगापूर (२५) या शहरांपेक्षा मुंबईतील हवा स्वच्छ होती. कुलाबा इथं २, माझगावमध्ये ५, भांडूप आणि चेंबूर इथं ८, बोरिवलीत १०, बीकेसीमध्ये १५, अंधेरीत १६, मालाडमध्ये १७, वरळीत १८ आणि नवी मुंबईत सर्वाधिक २६ एक्यूआय नोंदवण्यात आला.

कोरोनाच्या महामारीमुळं लॉकडाऊन सुरू असल्यानं रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नाही. मुंबईत सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी पहाटेदरम्यान मुसळधार पावसामुळं हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढलं. ताशी ३० किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांनी प्रदूषके वाहून नेली, अशी माहिती सफरकडून देण्यात आली आहे.हेही वाचा -

Ganesh Chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती

मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा