Advertisement

मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी

कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा हा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता मुंबईत १५ जुलैपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. १ जुलैच्या मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू असेल. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर पडण्याची परवानगी असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे.  तसंच यापूर्वीप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. मुंबई पोलीस आयुक्तालायाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या वर गेली आहे.  मिशन बिगीन अंतर्गत सरकारनं मोठी सुट दिली होती. मात्र, त्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा मुंबईत जमावबंदी  लागू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी घेतला आहे. 

१ जुलै मध्यरात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे. जमावबंदीदरम्यान अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  हेही वाचा -

Mumbai Local: मुंबई लोकलच्या ७०० फेऱ्या, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच

Marathi Compulsory: सरकारी कामकाजात मराठी न वापरल्यास वेतनवाढ रोखणार, ठाकरे सरकारचा निर्णय
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा