Advertisement

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. ऑईल मार्केटीग कंपन्यांनी (ओएमसी) अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रती लीटर १० पैशांनी आणि डिझेलच्या दरात १६ पैसे प्रती लीटरनी वाढ केली आहे.

मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर पुन्हा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. ऑईल मार्केटीग कंपन्यांनी (ओएमसी) अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रती लीटर १० पैशांनी आणि डिझेलच्या दरात १६ पैसे प्रती लीटरने वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढीव दर सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.


प्रती लीटरने वाढ

इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रती लीटर पैशांनी वाढ झाली आहे. तसंच, डिझेलच्या दरात १६ पैसे प्रती लीटरनी वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. परंतु, निवडणुका झाल्यावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात येईल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.


प्रति बॅरल २ डॉलर

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मागील आठवड्यात प्रति बॅरल २ डॉलर इतकी वाढ झाली होती. त्यानंतर, आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या तणावाचा देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होत आहे.

सोमवारी पेट्रोलची किंमत दिल्लीमध्ये ७१.१२ रुपये इतकी आहे. कोलकतामध्ये ७३.१९ रुपये, मुंबईमध्ये ७६.७३ आणि चेन्नईमध्ये ७३.८२ रुपये इतकी आहे. तसंच, सोमवारी डिझेलची किंमत दिल्लीमध्ये ६६.११ रुपये इतकी आहे. कोलकतामध्ये ६७.८६ रुपये, मुंबईमध्ये ६९.२७ आणि चेन्नईमध्ये ६९.८८ रुपये इतकी आहे.



हेही वाचा -

पावसाळ्यात डासांची पैदास टाळण्यासाठी एमएमआरसीची विशेष खबरदारी

१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीवर बंदी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा