Advertisement

१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी

पावासाळ्यात १ जून ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे.

१ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारीवर बंदी
SHARES

पावासाळ्यात १ जून ते ३१ जुलै २०१९ या कालावधीत राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे. पावसाळ्यात मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्यानं मासेमारीवर बंदी करण्यात आली आहे. मात्र, ही बंदी पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना लागू राहणार नसल्याचा आदेश राज्याच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयानं जारी केला आहे.


सुक्या मासळीचा साठा

यांत्रिक नौकांद्वारे समुद्रातील मासेमारीवर बंदी घातल्यामुळं या काळात ताजे मासे बाजारात मिळणार नाहीत. मात्र मत्स्यप्रेमींना खाडीतली मासळी व छोटे मासे खाता येणार आहेत. तसंच, या काळात मत्स्यप्रेमींना सुक्या मासळीचा साठा करून ठेवावा लागणार आहे.


प्रजोत्पादनाचा काळ

जून व जुलै महिन्यात माशांच्या प्रजोत्पादनाचा काळ असून, या काळात मासे अंडी घालण्याचा देखील काळ असतो. त्याशिवाय खराब व वादळी हवामानामुळं मच्छीमारांचा जीव धोक्यात येऊन आणि बोटी समुद्रात बुडून जीवित व वित्तहानी होण्याची भीती असते. त्यामुळं राज्यात १ जून ते ३१ जुलै या काळात यांत्रिक नौकांद्वारे समुद्रातील मासेमारीवर बंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीमध्ये मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार गलबत आणि त्यात पकडण्यात आलेली मासळी जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


नुकसानभरपाई नाही

बंदी काळात मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही. मच्छिमार सहकारी संस्थांच्या नौका मासेमारी करताना आढळल्या तर अशा संस्थांनी पुरस्कृत केलेलं अर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेच्या लाभासाठी विचारात घेतले जाणार नसल्याचं मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

राणीबागेच्या विकासासाठी २०० कोटी रुपये

माहिम स्थानकातील ओव्हरहेड पाइपलाइन प्रवाशांसाठी धोकादायक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा