Advertisement

पावसाळ्यात डासांची पैदास टाळण्यासाठी एमएमआरसीची विशेष खबरदारी

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात डासांची पैदास होऊ नये यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या मार्गिकच्या कामांच्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात येणार आहे.

पावसाळ्यात डासांची पैदास टाळण्यासाठी एमएमआरसीची विशेष खबरदारी
SHARES

मुंबईत ठिकठिकाणी सध्या मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. नुकताच कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या तेराव्या टप्प्याचं काम पुर्ण झालं. परंतु, या कामासाठी खड्डे खणले असून, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होण्याची शक्याता अाहे. त्यामुळं मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात डासांची पैदास होऊ नये यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या मार्गिकच्या कामांच्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात येणार आहे.


औषध आणि धूर फवारणी

साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास झाल्यानं विविध साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं हे टाळण्यासाठी एमएमआरसी विशेष खबरदारी घेत असून महापलिकेसोबत समन्वय साधून मेट्रो मार्गिकेच्या २७ स्थानकांसह मार्गिकेवर औषध आणि धूर फवारणी करत आहे. मुंबईतील पूर प्रवण भागात सर्व प्रकारची आपत्कालीन उपकरणं आणि वाहनं उपस्थित ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळं वाहतूक किंवा पाणी तुंबण्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाहीत.

पंपांची व्यवस्था

पावसाळ्यात मेट्रो-३ च्या प्रत्येक स्थानकामध्ये साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मान्सूनदरम्यान विद्युतीय व संचार व्यवस्था कायम राखण्यासाठी एमएमआरसी इतर यंत्रणाशी समन्वय साधणार आहे. बांधकाम स्थळावर जमा होणारा मलब्याचा निचरा टारपोलिननं झाकलेल्या डंपर्सद्वारे करण्यात येणार आहे. त्याशिवाय महानगरपालिकेचं स्थानिक कार्यालय आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी दररोज समन्वय साधला जाणार आहे.



हेही वाचा -

१ जून ते ३१ जुलै या काळात मासेमारीवर बंदी

माहिम स्थानकातील ओव्हरहेड पाइपलाइन प्रवाशांसाठी धोकादायक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा