Advertisement

वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर होणार कारवाई

वाहतुक नियमांचं उल्लंघन केल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं.

वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर होणार कारवाई
(Representational Image)
SHARES

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा वसा हाती घेतला आहे. त्यानुसार, वाहनचांलकांनी नियमांच पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. अशातच संजय पांडे यांनी मुंबईकरांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला ही लक्ष केलं आहे. ऑनलाइन मागवलेले खाद्यपदार्थ लवकर पोहोचविण्यासाठी अनेकदा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. त्यामुळं आता वाहतुक नियमांचं उल्लंघन केल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं.

आठवड्याच्या दर रविवारी संजय पांडे हे मुंबईकरांशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधतात. यावेळी त्वाहतूक, ध्वनिप्रदूषण तसेच बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, डिलिव्हरी बॉयच्या नियुक्तीदरम्यान चारित्र्य पडताळणी आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल होणार आहेत. यामध्ये डिलिव्हरी बॉयबरोबर कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

‘माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले, तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येईल. या डिलिव्हरी बॉय संबंधित नियमावलीही जारी करण्यात आली आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयची नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांना सेवा पुरवण्यासंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे’, असं संजय पांडे यांनी म्हटलं.

‘यांच्या कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून घेणे गरजेचे राहणार आहे. तसेच अनेकदा डिलिव्हरी बॉय क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे, आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवतात. याबाबतही कंपनी चालकाने दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. यांना व्यवस्थित गणवेश परिधान करण्यास सांगावे’, अशा सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत.

हेही वाचा - मुंबईकरांनो! तुमच्या गाड्या 'टो' होणार नाहीत; पोलीस आयुक्तांची घोषणा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा