Advertisement

मुंबईकरांनो! तुमच्या गाड्या 'टो' होणार नाहीत; पोलीस आयुक्तांची घोषणा

मुंबईत वाहतूक पोलिसांकडून गाडी टो केली जाणार नाही. यांसर्भात स्वत: मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माहिती दिली.

मुंबईकरांनो! तुमच्या गाड्या 'टो' होणार नाहीत; पोलीस आयुक्तांची घोषणा
SHARES

मुंबईत वाहतूक पोलिसांकडून गाडी टो केली जाणार नाही. यांसर्भात स्वत: मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माहिती दिली असून, मुंबईकरांनी जर नियमांचे पालन केले तर अशी कारवाई करणे थांबविले जाईल, असं संजय पांडे यांनी म्हटलं.

''प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवीत आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा!'', असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं.


रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळं नाइलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. मग पोलीस ती उचलून नेतात. अशा प्रकारच्या कारवाईमुळे अनेकदा पोलिसांवर टीका केली जाते. परंतू, आता अशा वाहनांवर केली जाणारी कारवाई आता एक आठवडा थांबणार आहे. याबाबतच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. मुंबईकरांनी नियमांचे पालन केल्यास यापुढेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुंबईत वाहनांची गर्दी प्रचंड वाढली असल्यानं पार्किंगची मोठी समस्या आहे. अनेकदा रस्त्याच्याकडेला किंवा नो-पार्किंगमध्ये वाहनचालकांकडून गाड्या उभ्या केल्या जातात. अशावेळी संबंधित रस्त्यांवर वाहतुककोंडीची शक्यता असते, तसंच ह्या रस्त्यावर नो-पार्किंग असं लिहिलेले असल्यास वाहतुक पोलिसांकडून ती गाडी टो (कारवाई) केली जाते. मात्र, आता मुंबई पोलिसांकडून ही कारावाई थांबवली जाणार आहे.

मुंबईत बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गेल्यानंतर काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाचे पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. मुंबईत अनेक बाजारपेठांच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे, पण ती बाजारपेठेपासून लांब आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा