Advertisement

मुंबईत भाड्याने राहण्यासाठी पोलिस एनओसी आवश्यक नाही

मुंबई पोलिसांनी सोमवारी अशी अधिसूचना जारी केली

मुंबईत भाड्याने राहण्यासाठी पोलिस एनओसी आवश्यक नाही
SHARES

शहरातील फ्लॅट किंवा अपार्टमेंट भाड्याने देण्यासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक नाही, अशी अधिसूचना मुंबई पोलिसांनी सोमवारी जारी केली. अनेक वर्षांपासून हा नियम लागू आहे.

मिड डेच्या वृत्तानुसार, अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की घरमालक ऑनलाइन अर्ज करून, किंवा थेट संबंधित पोलिस स्टेशनला अर्ज सबमिट करून किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे अर्ज पोलिस चौकीला पाठवून भाड्याने दिलेल्या जागेबद्दल अधिकाऱ्यांना सूचित करू शकतात.

फ्लॅट किंवा हाऊस मालकांच्या सोयीसाठी ऑनलाइन सेवा देण्यात आल्या आहेत. पडताळणीसाठी घरमालकाच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. प्रकाशित केलेली सर्व माहिती खरी असली पाहिजे आणि भाड्याने घेतलेल्या जागेचा पत्ता घरमालकाच्या पत्त्यासारखा नसावा.

या सेवा विनामुल्य आहेत आणि कोणीही मध्यस्थ यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल तर तत्काळ संबंधित पोलिसांकडे तक्रार करावी.

परदेशी लोकांना अपार्टमेंट भाड्याने देणे

या वर्षाच्या सुरुवातीला, मुंबई पोलिसांनी शहरातील परदेशी लोकांना मालमत्ता भाड्याने/भाडेपट्टीवर देण्याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते.

आदेशानुसार जर राहण्याची जागा एखाद्या परदेशी व्यक्तीला भाड्याने दिली असेल, तर मालक आणि परदेशी यांनी त्याचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील म्हणजेच पासपोर्ट क्रमांक, जारी करण्याची जागा आणि तारीख, वैधता, व्हिसा सादर करावा. तपशील म्हणजे व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैधता, नोंदणी ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण देखील मनूद करावे. हा आदेश 8 मार्च 2023 पासून लागू झाला आहे.



हेही वाचा

लगून रोड ते इन्फिनिटी मॉल पर्यंतच्या पुलाला मंजूरी

पश्चिम द्रुतगती महामार्गावर नवीन अद्ययावत शौचालय उभारणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा