Advertisement

पश्चिम द्रुतगती महामार्गावर नवीन अद्ययावत शौचालय उभारणार

गोरेगाव विरवाणी इथे प्रस्तावित प्रसाधनगृहात पुरुषांसाठी पाच, महिलांसाठी पाच आणि दिव्यांगांसाठी एक शौचालय असेल.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर नवीन अद्ययावत शौचालय उभारणार
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) तर्फे गोरेगाव (पूर्व) येथील वेस्टर्न एक्स्प्रेस वे (WEH) वरील विरवाणी औद्योगिक वसाहतीजवळ विविध अद्ययावत सुविधा असलेले सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे.

1,453 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या शौचालयात पुरुष, महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असतील. यामध्ये महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन, बाळांसाठी स्वतंत्र खोली, बेबी डायपर बदलण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाइल चार्जिंग स्टेशन आणि शीतपेयांसह ‘एटीएम’ आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असतील.

प्रस्तावित प्रसाधनगृहात पुरुषांसाठी पाच, महिलांसाठी पाच आणि दिव्यांगांसाठी एक शौचालय असेल. या शौचालयाच्या छतावर विजेसाठी सोलर पॅनल बसवण्यात येणार आहे. या पॅनलमधून वीस किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे.

मुख्य रस्ते आणि द्रुतगती मार्गावर स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा उपलब्ध झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यासाठी हे सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे. या स्वच्छतागृहाची दैनंदिन स्वच्छता आणि देखभालही पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत केली जाईल, असे पी दक्षिण प्रभागाचे सहायक आयुक्त राजेश आक्रे यांनी सांगितले.

पालिकेने गेल्या वर्षी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून WEH आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या देखभालीची जबाबदारी घेतली.



हेही वाचा

शिवडी क्षयरोग रुग्णालयातील रुग्णांच्या आहारात मांसाहारी पदार्थांचा समावेश

पालिकेची मालाडमधील बेकायदेशीर रूफटॉप हुक्का पार्लरवर कारवाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा