Advertisement

'सागरी कवच' प्रशिक्षणात मुंबईचे सागरी पोलिस अव्वल


'सागरी कवच' प्रशिक्षणात मुंबईचे सागरी पोलिस अव्वल
SHARES

26/11 च्या दहशतवादी हल्यानंतर नेव्ही आणि इतर सुरक्षा यंञणांची तत्परता पाहण्यासाठी 'सागरी कवचहे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. 22 आणि 23 जानेवारी असे दोन दिवस हे शिबीर राबवलं गेलंया प्रशिक्षण शिबिरात देशभरातील सर्व सुरक्षा यंत्रणा सहभागी झाल्या होत्यात्यात मुंबई पोलिसांनी आपला वेगळा ठसा उमटवत अव्वल स्थान पटकावलं आहे.

सुरक्षेसाठी 'सागरी कवच'

मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्यानंतर समुद्र सुरक्षेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. यासाठी समुद्र सुरक्षेसाठी वेळोवेळी सक्षम पाऊलं देखील उचलण्यात आली. मात्र त्याच बरोबर तटरक्षक दलावरील यंत्रणा किती सावध आहे, हे पाहणंही तितकंच गरजेचं असल्यामुळे नेव्हीनं 'सागरी कवच' हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या प्रशिक्षण शिबिरात 13 राज्यातील समुद्र सुरक्षा रक्षक यंत्रणा सहभागी झाल्या होत्या. समुद्रात कशा प्रकारे गस्त घातली जाते. संशयित गोष्टी कशा ओळखायच्या, आप्तकालिन परिस्थितीती कसे आणि कोणते निर्णय घ्यावेत आणि इतर महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले.

पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

प्रशिक्षण शिबिराचाच एक भाग म्हणून सागरी पोलिस आणि इतर यंत्रणा किती सतर्क आहेत हे पाहण्यासाठी, संशयित व्यक्तीला एका लँडिंग पाईटकडे पाठवण्यात आलं. यामध्ये लाल टिम आणि ब्ल्यु टिम अशा दोन टिम केल्या जातात. लाल ही दहशतवाद्यांची आणि ब्ल्यू ही पोलिस किॆवा इतर सुरक्षा यंत्रणांची असते. लाल टिम ही केव्हा ही कुठल्याही पॉईंटवर साध्या वेशात घुसण्याचा प्रयत्न करते.  त्यांना ब्ल्यु टिमनं रोखायचे असते. यावर्षी अशा टास्कमध्ये मुंबईच्या सागरी पोलिसांनी लाल टिमला शहरात घुसण्याची संधी दिली नाही. मुंबई सागरी पोलिस हे सर्व प्रशिक्षण शिबिरात अव्वल ठरले. मात्र या सागरी कवच शिबिरात एका पोलिस कर्मचाऱ्याचा ह्रद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला


हेही वाचा

व्हॉट्स अॅप ग्रुपमधील अन्य दोन संशयित एटीएसच्या ताब्यात

धक्कादायक! प्रजासत्ताकदिनी अॅसिड हल्ल्याचा होता कट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा